हॉकी

हॉकी, किंवा फील्ड हॉकी, हा एक सांघिक खेळ आहे. ह्या खेळात खेळाडू स्टीकच्या मदतीने चेंडू विरुद्ध संघाच्या गोलमध्ये टाकण्याचा प्रयत्‍न करतात. या खेळाचे रूढ नाव हॉकी असले तरी आइस हॉकी सारख्या इतर हॉकी प्रकारांसाठी वेगळी नावे वापरली जातात. काही देशांत या खेळाला फील्ड हॉकी म्हणतात.
हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे.
हॉकीमध्ये पुरूष व महिलांसाठी नियमितपणे भरवल्या जाणार्‍या अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहेत. त्यांत ऑलिंपिककॉमनवेल्थ खेळहॉकी विश्वचषक , चँपियन्स चषक व युवा हॉकी विश्वचषक या स्पर्धांचा समावेश होतो.
आंतरराष्ट्रीय हॉकी संघटन (एफ आय एच) ही या खेळाची सर्वोच्च संघटना आहे. ही संघटना हॉकी विश्वचषक व महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करते तसेच खेळांची नियमावली ठरवते. हाॅकी खेळात ३५-३५ मिनिटांचे दोन हाफ असतात तर दोन हाफच्यामध्ये १० मिनिटांचा ब्रेक असतो.
अनेक देशांमध्ये क्लब हॉकी स्पर्धा आहेत. जगात फुटबॉल व क्रिकेटनंतर सर्वात जास्त खेळाडू असणारा हा खेळ आहे. आंतरराष्ट्रीय हॉकी सामने पुरूष आणि महिला खेळतात.
ज्या देशात हिवाळ्यामुळे मैदानात हा खेळ खेळता येत नाही तेथे हा खेळ  इंडोअर खेळला जातो. इंडोअर फील्ड हॉकीचे नियम नेहमीच्या हॉकीपेक्षा वेगळे आहेत. उदा. एका संघात नियमित ११ ऐवजी फक्त, ६ खेळाडू असतात. मैदानाचा आकार बहुधा ४० मी x २० मीटर असा असतो. शूटिंग सर्कल ९ मीटर आकारमानाचे असते.. मैदानाला सीमांऐवजी बॅरियर्स असतात.
हॉकी सामना
सर्वोच्च संघटनाआतंरराष्ट्रीय हॉकी संघटन
सुरवात१९ वे शतक
माहिती
कॉन्टॅक्टनाही
संघ सदस्य११ खेळाडू मैदानात
वर्गीकरणइंडोर - आउटडोअर
साधनहॉकी चेंडू,हॉकी स्टीक
ऑलिंपिक१९०८,१९२०,१९२८-सद्य

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा