लंगडी हा एक भारतीय मैदानी खेळ आहे.
- क्रिडांगण
- लांबी- १२.१९ मीटर, रूंदी- १२.१९ मीटर, कर्ण- १७.२४ मीटर
- खेळाडू
- दोन संघाचे प्रत्येकी १२ खेळाडू असतात.
- खेळणारे ९ राखीव ३ खेळाडू असतात.
- वेळ
- प्रत्येकी ५ ते ७ मिनीटांचे ४ डाव.
- दोन वेळा लंगडी व पळती.
- नियम
- लंगडी घालणाराने खेळणारास(पळणारा) बाद केल्यास लंगडी घालणारा संघास १ गुण दिला जातो.
- फक्त हातानेच गडी बाद करावा लागतो.
- लंगडी घालणाराचा हात अथवा वर धरलेला पाय जमिनीस टेकल्यास लंगडी घालणारा बाद.
- बाद झालेला लंगडी घालणारा खेळाडू मैदानाबाहेर गेल्याशिवाय पुढच्या खेळाडूने प्रवेश करु नये.
- पळतीचे सर्व गडी बाद झाले तरी वेळ शिल्लक असेल तर पुन्हा बाद झाल्याच्या क्रमाने पळतीचे खेळाडू पळतील.
- धावणाराला लंगडी घालणाराने स्पर्श केला तसेच धावणारा मैदानाबाहेर गेला तर तो बाद होतो.
- जास्त गुण मिळविणारा संघ विजयी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा