मंगळवार, २० जून, २०१७

बदली


*बदली-विशेष संवर्ग भाग 1*

विशेष संवर्ग भाग 1 साठी *Transfer Portal*  सुरु झाले आहे...
      *विशेष संवर्ग भाग 1* अंतर्गत खालील 1⃣3⃣ घटकांचा समावेश होतो...

0⃣1⃣ *पक्षाघाताने आजारी शिक्षक ..*
0⃣2⃣ *अपंग शिक्षक,मतिमंद मुलांचे व अपंग मुलांचे पालक...*
0⃣3⃣ *ह्रदय शस्त्रक्रिया झालेले शिक्षक..*
0⃣4⃣ *जन्मापासून एकच किडनी असलेले/मुत्रपिंड रोपण केलेले/डायलिसीस सुरु असलेले शिक्षक...*
0⃣5⃣ *कॅन्सरने आजारी शिक्षक...*
0⃣6⃣ *आजी/माजी सैनिक व अर्धसैनिक जवानांच्या पत्नी/विधवा..*
0⃣7⃣ *विधवा कर्मचारी..*
0⃣8⃣ *कुमारिका कर्मचारी..*
0⃣9⃣ *परित्यक्ता/घटस्फोटीत महिला कर्मचारी..*
1⃣0⃣ *वयाची 53 वर्षे पूर्ण केलेले शिक्षक/शिक्षिका...*
1⃣1⃣ *मेंदूचा आजार झालेले शिक्षक..*
1⃣2⃣ *स्वातंत्र्य सैनिकाचा मुलगा/मुलगी/नातू/नात(स्वातंत्र्यसैनिक हयात असेपर्यंत..)*
1⃣3⃣ *थॅलेसेमिया विकारग्रस्त मुलांचे पालक..*

 🍁विशेष संवर्ग भाग 1 अंतर्गत शिक्षकांना *बदली नको*असेल तर बदलीतून *सूट* मिळते. *अशा नकार देणा-या शिक्षकांच्या जागा कोणालाही मागता येणार नाहीत..*या संवर्गातील शिक्षक अगदी *सेवानिवृत्तीपर्यंत*  त्याच शाळेत राहू शकतात..
🍁विशेष संवर्ग भाग 1 अंतर्गत शिक्षकांना बदली हवी असेल तर जिल्ह्यातील *कोणत्याही बदलीपात्र* शिक्षकाची जागा तो मागू शकतो..( *सिनीयर असो किंवा ज्युनियर*)

💻 *Online विवरणपत्र भरण्याची कार्यपद्धती...*

🌷HM login वरुन *Transfer Portal login* करा..
🌷4 टॅब दिसतील,त्यातील *Intra-District Transfer* या टॅबला क्लिक करा...
🌷त्यातील 1 ली *Transfer Application* या टॅबला क्लिक करा..
🌷 *Select Designation*मध्ये Under graduate/Graduate यापैकी जे असेल ते क्लिक करा..
🌷 *Select teacher* मधून ज्यांचा form भरायचा त्या शिक्षकाला select करा..
🌷संबंधित शिक्षकाची *staff portal* ला *verify*केलेली माहिती दिसून येईल..
     ज्यांची माहिती staff portal ला भरलेली नाही किंवा verify केलेली नाही, *त्यांची नावे विवरणपत्र भरण्यासाठी दिसणार नाहीत...*
🌷 *Select Category* वर क्लिक करा..
🌷 *Select sub-category* वर क्लिक करा...
🌷 *13 संवर्ग* दिसतील..लागू असेल तो निवडा..
🌷 *Select subject* मध्ये सहशिक्षक असेल तर All subject असं दिसेल..पदवीधर/विषयशिक्षक असेल तर शिक्षकाचा विषय निवडा..
🌷त्यानंतर *"बदलीपात्र यादीत माझं नाव असलं तरी मी विशेष संवर्ग भाग 1 मध्ये असल्यामुळे मला बदलीतून सूट हवी.."*असं वाक्य आहे..
   बदलीतून सूट हवी असेल तर *Yes*ला क्लिक करा...
    बदली हवी असेल तर *No* ला क्लिक करा...
🌷 *Yes* ला क्लिक केल्यास 20 पसंतीक्रम भरण्याची गरज नाही/भरता येणार नाहीत..
🌷 *No*ला क्लिक केल्यास जास्तीतजास्त 20 पसंतीक्रम भरता येतील...
🌷पसंतीक्रम भरताना  *जिल्हा* निवडा किंवा आपोआप दिसेल...
🌷त्यानंतर *तालुका* निवडा..जिल्ह्यातील सर्व तालुक्यांची यादी दिसेल...त्यातील हवा तो तालुका निवडा..
🌷 *Select village*मध्ये निवडलेल्या तालुक्यातील महसूली गावांची यादी दिसेल..गाव निवडा..
🌷 *Select school* मध्ये निवडलेल्या महसूली गावातील सर्व जि.प.शाळांची नावे दिसतील,त्यातील शाळा निवडा...
🌷अशाप्रकारे 20 शाळा निवडून *add* करत राहा..
🌷भरलेल्या पसंतीक्रमामध्ये *Save* करण्याच्या आधी बदल करता येतील..
🌷पसंतीक्रम *delete* करता येईल.. *update* करता येईल..पसंतीक्रम   *खाली-वर* करता येईल..
🌷 *आवश्यक*तसे विवरणपत्र भरल्यानंतर save करा..
🌷अर्ज save केल्यानंतर प्रिंटसाठी कसा दिसतो हे पाहण्यासाठी टॅब क्र.2 *Veiw option(draft version)*क्लिक करा..हा form मराठीतून दिसेल..
🌷माहिती तपासून ती बरोबर असल्यास टॅब क्र.3 *Verification of transfer application* करा..
🌷माहिती पुन्हा तपासा..बरोबर असल्यास *verify* करा..
🌷Verify केल्यानंतर विवरणपत्रात *कोणत्याही प्रकारचा बदल करता येणार नाही...*त्यामुळे जे काही बदल करायचे असतील ते *verify करण्यापूर्वीच करावेत..*
🌷Verify केल्यानंतर टॅब क्र.4 *Print transfer application* मधून प्रिंट काढावी....

        🌺 *दक्षता*🌺  

*Online form हे HM/BEO login वरुन भरता येणार आहेत..*
   ज्या शिक्षकाचा form भरायचा आहे त्याच्या सहीने offline form *स्थळप्रत* म्हणून HM ने भरुन घ्यावा..
विशेष संवर्ग भाग 1 मधील 13 घटकांपैकी आवश्यक घटकाचा *खरा पुरावा* शिक्षकाकडे उपलब्ध असेल तरच HM login वरुन संबंधित form भरावा..
      *Online विवरणपत्राच्या 3 प्रती काढाव्यात..1 प्रत संबंधित शिक्षकाला द्यावी..1 प्रत पुराव्यासह शाळेत स्थळप्रत म्हणून ठेवावी...1 प्रत पुराव्यासह BEO कार्यालयात जमा करावी...*
     *बदलीच्या कोणत्याही टप्प्यावर कागदपत्रांची पडताळणी होऊ शकते...*

🌷 *साधारणपणे गरजेपुरते बदल होऊन अशीच प्रक्रिया यापुढे टप्पा क्र.3,4 व 5 मध्ये राबविली जाईल......*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा